ओवाळू आरती माझ्या किसनगिरी नाथा, माझ्या सदगुरू नाथा |
नमितो तुजला मी, चरणी ठेवूनिया माथा || धृ. ||भस्मांकित बलदंड तनु ती पाणीदार डोळे | देवा पाणीदार डोळे |
मनोमनी तृप्ती होई पाहुनी रूप तुझे सावळे || १ ||
आत्मज्योतीने ओवाळिले तुजला सदगुरू नाथा , माझ्या गुरुदेव दत्ता |
तव पायी सदा लीन मी, देवा शरणागत आता || २ ||
No comments:
Post a Comment