हिंदू धर्मात चार आश्रम सांगिलेले आहेत.
१. ब्रह्मचर्य २. गृहस्थाश्रम ३. वानप्रस्थाश्रम ४. संन्यासाश्रम
सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनतसुजाता या ब्रम्हदेवाच्या चार मानसपुत्रांनी निवृत्ती मार्ग स्वीकारला. म्हणूनच सर्व संन्याशांचे मूळ या चौघांपाशी येऊन पोहोचते. कलियुगातला शिव शंकराचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष आदी शंकराचार्यच होय. आदी शंकराचार्यांनी हिंदू धर्माला आलेली मरगळ वा ग्लानी दूर करून हिंदू धर्माचे पुनर्जीवन केले आणि देशाच्या चार दिशांना चार भागात मठांची स्थापना केली.
दक्षिण - आम्नाय | पश्चिम - आम्नाय | पूर्व - आम्नाय | उत्तर - आम्नाय | |
मठ | शृंगेरी | द्वारका | जगन्नाथपुरी | ज्योतीर्धाम |
पद (क्रम) | पुरी, सरस्वती, भारती | तीर्थ, आश्रम | वन, अरण्य | गिरी, पर्वत. सागर |
आचार्य | सुरेश्वर | हस्तमालक | पद्मपदा | तोटकाचर्य |
संप्रदाय(पंथ) | भूरीवारा | कीरावारा | भागावर | आनंदावर |
क्षेत्र | रामेश्वर | द्वारका | पुरुषोत्तम | बद्रीक्षेत्र |
देव | आदि-वराह | सिद्धेश्वर | जगन्नाथ | नारायण |
उपनिषद | बृहदारण्यक | छांदोग्य | तैत्तिरीय | मांडुक्य |
वेद | यजुर्वेद | सामवेद | ऋग्वेद | अथर्ववेद |
महावाक्य | अहं-ब्रह्मास्मी | तत्त्वमसि | प्रज्ञानं ब्रह्मा | अयंआत्मा ब्रह्मा |
देवी | कामाक्षी (शारदा) | भद्रकाली | विमला | पूर्णा गिरी |
तीर्थ (नदी) | तुंगभद्रा | गोमातीतीर्थ | महोनाधी | अलकनंदा |
गोत्र | भावेश्वर | अधिगता | कश्यप | भृगु |
१. शृंगेरी २. जगन्नाथ पुरी ३. द्वारका ४. जोशी मठ
हि हिंदू धर्मांची चार पीठे नेमली. हि चार पीठे हिंदू धर्माची वैदिक ज्ञान पीठे होत.
जोशी मठ : उत्तरेतील जोशी मठाच्या परंपरेत गिरी हि सर्वोच्च पदवी होती. आपला चरित्रनायक किसनगिरी यांनी हि पदवी प्राप्त केली. आपले सर्व आयुष्य धर्म प्रचारासाठी वाहिले.
किसनगिरी महाराज (जन्म १० ओगस्ट १८६८ - निर्वाण ६ मार्च १९५१) यांचा जन्म घोरपडे घराण्यात झाला. घोरपडे म्हणजे छत्रपतींचे भाऊबंदच होय. लहानपणापासूनच घरातल्या धार्मिक संस्कारामुळे यांचा कल देवधर्माकडेच होता. आणि हा मुलगा देव शोधण्यासाठी तळमळू लागला. सेनापती घोरपडे घराण्याच्या कापशी शाखेतील या मुलाने देव शोधार्थ घर सोडले. फिरत फिरत कागल येथील लक्ष्मी मंदिरात थांबला. छत्रपती शाहू महाराज यांची या लक्ष्मीवरती नितांत श्रद्धा होती. छत्रपती पहाटे चार वाजता लवाजम्याशिवाय येत असत. अशाच एका पहाटे मंदिरातील खांबाच्या आडून काहीतरी हलल्याचा भास झाला. छत्रपती गरजले, "कोण आहे तिकडे? समोर ये". मशालीच्या उजेडात एक युवक समोर आला. ओठावर कोवळी मिसरूड , बलदंड शरीर वर्णाने काळा सावळा, डोक्यावरचे केस विस्कटलेले पण डोळ्यांत वेगळीच चमक होती. "महाराज मी कृष्णा बाबा. खडकपाड्याच्या घोरपडेंचा मी चिरंजीव." शांत धीम्या स्वरात तो बोलला. "मग इथे देवीच्या देवळात काय करतोस? "
"महाराज देव शोधतोय."
"येडा कि खुळा आहेस, असा शोधून देव सापडतो व्हय रे? जा माघारी परत. आई बाप काळजी करत असतील. आमच्या नात्यासंबंधातला आहेस मग तलवारबाजी करून मर्दुमकी दाखवायची कि येड्यावानी रानोमाळ भटकून देव शोधायचा. जा माघारी जा. नाही महाराज."
“मर्द मराठ्याचा पोर हाय. एकदा पुढं घेतलेलं पाउल मी माघारी घेणार नाही. महाराज माय लक्ष्मीने आपल्याला अंबाबाईच्या छायेत छत्रपती बनवलं तर मग ती मला देव शोधण्याला का मदत करणार नाही. आशीर्वाद असावा."
महाराजांनी त्या युवक मराठ्याच्या डोळ्यात विश्वासाची चमक पाहिली आणि आपल्या गळ्यातला मोत्याचा हार त्याच्या गळ्यात घातला व म्हणाले, " वा रे गड्या, तुझ्या कोवळ्या ओठातलं दुध सुकले नाही आणि तू देव शोधायला निघालास. जा बाबा जा. गुरुदत्ताला शरण जा. नरसोबाच्या वाडीला जा. आई जगदंबेची कृपा तुझ्यावर राहो."
हा युवक म्हणजेच आपला चरित्र नायक "किसनगिरी"
सेनापती कापशीकर घोरपडे घराण्यातील खडकपाडा शाखेतील हा कृष्णा बाबा आपली जहागीर घर दार सोडून देव शोधण्यास भ्रमण करू लागला. श्री नरसिंह वाडी म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराजांची राजधानी होय. कृष्णा-पंचगंगा संगमावर प्रत्यक्ष दत्तांच्या सानिध्यात कृष्णाने अनुष्ठान मांडले. लोक कुतूहलाने आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असत. एकदा अचानक संगमावर टेंबे स्वामी व कृष्णाची नजर भेट झाली. खुणेला खुण पटली. आणि त्या नजरेमधूनच कृष्णाला खूप काही समजले. वासुदेवानंद सरस्वतींनी मार्ग सांगितला आणि त्याची प्रचंड ओढ पाहून प्रत्यक्ष दत्त तुला अनुग्रह देतील असे सांगितले.
गुरुचरित्राची पारायणे सुरु झाली, सातवे पारायण होताच प्रत्यक्ष दत्तांनी अनुग्रह व आज्ञा दिली, "सिद्ध स्थानांची भ्रमंती कर आणि तुझे जीवन लोक कल्याणार्थ व्यतीत कर. सावळ्या रंगामुळे डोळ्यात चमक असलेल्या कृष्णाला लोक ओळखू लागले. तेथून कृष्णाची भ्रमंती सुरु झाली. मत्स्येंद्रगड, चौरोबाचा डोंगर, गोरखनाथ मठ (बत्तीस शिराळ), वृद्धेश्वर (म्हातारबाबाचा डोंगर), त्र्यंबकगिरी , श्री शैल्य, दक्षिणेपासून उत्तरेकडे अनेक सिद्धस्थानांना भेटी देत कृष्णाबाबा भ्रमंती करत होते. यांत त्यांना अनेक शिष्य मिळाले. त्यांना कुणी "कृष्णा बाबा" तर कुणी "किसन बाबा" तर कुणी "काळाबाबा" म्हणत.
हळूहळू त्यांचा कीर्ती सुगंध दशदिशा दरवळू लागला. अनेक संत, महंत, महात्मे आखाडे यांच्या मध्ये आपला वेगळा ठसा उमटवीत किसनबाबा "श्री शैल" येथे पोहोचले. सर्व मान्यतेमुळे त्यांना तेथे "गिरी" पदवी देण्यात आली व पट्टाभिषेक करण्यात आला.
श्री शैल्य हा डोंगराळ व घनदाट जंगलाने व्यापलेल्या डोंगराळ प्रदेश. पावसाळ्याचे दिवस होते. धुवाधार पाऊस उन्मनी अवस्थेत किसन एका गुहेत शिरला. नाग-सापाच्या वावर असताना देखील भीती न बाळगता कृष्णा गुहेत पोहोचला. त्या काळ्याकुट अंधारात देखील समोर एक स्वच्छ प्रकाश दिसत होता, डोळे उघडताच पुढे पाहतो तर तीन साधू ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यातील एक उच्चासनावर व दोन साधू खाली बसले होते. "आओ बेटा आओ, हम तुम्हाराही इंतजार कर रहे थे, धुनी के पास बैठ जाओ"

पावसात भिजलेल्या, थंडीने कुडकुडणा-या कृष्णाला थोडी उब आली. त्या तीन तेजस्वी महापुरुषांकडे पाहत असताना धीर-गंभीर शब्द कानी पडले, "देखो हमे गहिनीनाथ कहते है | यदि आकाश भी तड़तड़ापड़े और मेरु कड़कडा उठे, तो भी आत्मसुख के आस्वादन से कभी विरत मत होना | भगवान अत्यंत समीप है, संदेह छोड़कर देखो, आत्मनिष्ठा अखंड बनाए रखो और श्रीकृष्ण के रूप में रममाण रहो|" किसनच्या अंगावर रोमांच उभे राहिले, विद्युल्लता चमकून गेली. प्रत्यक्ष दत्त स्वरूप कृष्ण रूप दिसू लागले. देहभान हरपून गेले. ज्याच्यासाठी केला अट्टाहास तो अनेक खडतर, भ्रमंतीनंतर पूर्णत्वास गेला. किसनच्या अंगावर रोमांच उभे राहिले, विद्युल्लता चमकून गेली. प्रत्यक्ष दत्त स्वरूप कृष्ण रूप दिसू लागले. देहभान हरपून गेले. ज्याच्यासाठी केला अट्टाहास तो अनेक खडतर, भ्रमंतीनंतर पूर्णत्वास गेला. कंठ दाटून आला. थरथरत्या ओठातून शब्द फुटले, "सम्यक अनन्यता". ब्रह्मानंदाची टाळी वाजली. सात दिवस कसे गेले याचा पत्ताही लागला नाही. महावाक्याचा उपदेश, योग मार्गाची दीक्षा व प्रत्यक्ष गहिनीनाथांनी निरोप देऊन जगन्नाथ पुरीस जाण्याचा आदेश दिला. किसनबाबा जगन्नाथ पुरीस पोहोचले. येथेही चमत्कार झाला. तेथील अर्चकाने किसनबाबांना कटांजनाच्या आत यायला मज्जाव केला. खिन्न मानाने बाहेर आलेल्या किसन बाबांना प्रत्यक्ष जगन्नाथाने वृद्ध ब्राह्मणाच्या रुपात येतून नमस्कार करण्यास सांगितले. एक सहस्त्र शाळीग्रामावर आरूढ असलेल्या जगन्नाथाच्या दर्शनाने किसनबाबा कृतकृत्य झाले. जगन्नाथाचा रक्षक श्री नरसिंह याने दृष्टांत दिला व सांगितले कि माझ्या क्षेत्री म्हणजेच दक्षिण काशी क्षेत्री तू माझे अर्थात तुझे स्वयंभू क्षेत्र निर्माण कर.
किसनबाबाचा खरा प्रवास येथून सुरु झाला. जोगीप्रयाग, अयोध्या, केदारनाथ, वृंदावन, द्वारका, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, वृंदावन पुष्कर, रामेश्वर, पशुपतीनाथ, अमरनाथ, हिंगलाज असा नाथ सांप्रदायिक प्रवास केला.
शिव भैरव व शक्ती यांच्या सर्व मंदिरांना तीर्थरूप मानून भ्रमण केले. नेपाल ते रामेश्वर पर्यंत विखुरलेल्या सांप्रदायिक मठ मंदिरांचाही प्रवास केला. अंगणा (उदयपुर). आदिनाथ बंगाल, कादरी मठ - मद्रास, गंभीर मठ - पुणे, गरीबनाथ टीला, गोरखक्षेत्र गिरनाथ, गोरख बन्सी (डमडम बंगाल ), चंद्रनाथ - बंगाल, चंचलगिरी मठ (मद्रास), त्र्यंबक मठ - नाशिक , नीलकंठ महादेव - आग्रा, नोहर मठ - बिकानेर, पंचमुखी महादेव आग्रा, पांडू धुनी - मुंबई, वीर सोहर - जम्मू, भर्तु-गुफा (ग्वाल्हेर), भर्तु गुफा - गिरनार, मंगलेश्वर (आग्रा), महानाद मंदिर बरद्वा (बंगाल) महामंदीर मठ (जोधपुर), योगी गुहा (दिनाजपुर), योगी अवन (बगुंडा), महामंदीर मठ (मेदिनिपूर). लादुवास (उदयपुर), हांडी भरंगनाथ (म्हैसूर), हिंगुआ (जयपूर) इ. नाथ सिद्ध पिठांना भेटी दिल्या. महाराष्ट्रात नगर जिल्ह्यांतील वृद्धेश्वराचा डोंगर, त्र्यंबकेश्वरचा डोंगर , देवगिरीवरील जनार्दन स्वामींचे साधना स्थान, चंद्रगिरीवरील समर्थांचे साधना स्थान , पैथांचा शिवदीन केसरीचा मठ, अलंदिजवळ अडबंगनाथाचे डुडुळगांव, संत कान्होबा पाठक यांचे केंदू गांव (शिरूळ तालुका), दिवेघाटात कानिफनाथ मढीचा मायंबा व कानोभा, विदर्भातील अंभोरे, हिंदवाडा खेडले , अंबेजोगाई परळीवैजनाथ , मच्छिंद्रगडचा मत्स्येंद्रनाथ, ऐतगावचा धर्मनाथ (विटा), ललगुणचा नागनाथ, विट्याचा रेवणनाथ , पुसेगावचे सेवागिरी, त्रिपुटीचे गोपालनाथ, मिरजेचे मिरासब, जगुळची मांसाहेबी, बागणीचा दर्गा, इस्लामपूरचा संभू अप्पा, नांद्रे येथील ख्वाजाबाबा - कबीरबाबा, खात्गुन येथील राजेबागसवार, निपाणीचा गैनीनाथ , हालसिद्धनाथ आप्पाची वाडी, आडीमलय्या , मंगसुळींचा खंडोबा , अर्गिची लक्ष्मी , विड्याची खडी आई. व सूळकाई , तोंडोलीची साजबाई, कर्हाडचा कंबेळेश्वर, नरसिंगपूरचा नरहरी इ. ठिकाणी भेटी दिल्या.

नरसिंगपूरच्या नरहरीच्या मंदिरात, पुनश्च दृष्टान्त झाला. वारणावतीच्या परिसरात मठ उभारण्याची आज्ञा केली. शेजारीच बत्तीस शिराळा येथे प्रत्यक्ष अंबाबाई पुढे नागपंचमीस नाग खेळवले जातात. शिराळा पेट्यातील मंगल्याच्या मंगळवतीने (यमाईने) दृष्टान्त दिला की किसनगिरी सरूड गावी यावे.
बत्तीस शिराळ्याच्या दक्षिणेस कसबा सरूड वारणेच्या काठावर वसलेले टुमदार गांव. या गावातच आहे किसनगिरींचा आपला मठ. कसबा सरूड आग्नेयेला पन्हाळा म्हणजेच पन्हागालय इथे व्यासपिता पराशर ऋषींची तपोभूमी तर वायव्येस विशालगड या निसर्गमय परिसरात आपल्या आध्यात्मिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
आद्य शंकराचार्य परंपरेत
आद्य शंकराचार्य परंपरेत
"तीर्थाश्रम वनारण्य गिरी पर्वत सागरा: |
सरस्वती भारतीच पुरीति दश कीर्तिताः | '
श्रीमदभागवत म्हटलंय जिथे संतांचा सहवास असेल तेथे माझ्या चरित्राच्या, हृदयास मोहक कानास मधुर गोष्टी होतील. ज्यांच्या केवळ श्रवणाने, मोक्षमार्गात श्रद्धा, प्रेम व भगवंताच्या भक्तीत वृद्धी होते.
श्रीमदभागवत म्हटलंय जिथे संतांचा सहवास असेल तेथे माझ्या चरित्राच्या, हृदयास मोहक कानास मधुर गोष्टी होतील. ज्यांच्या केवळ श्रवणाने, मोक्षमार्गात श्रद्धा, प्रेम व भगवंताच्या भक्तीत वृद्धी होते.
किसनगिरी व टेंबे स्वामी यांची भेट श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे झाली होती पण पंढरपूर मार्गावर असलेल्या कुवलापूर या गावी श्री सिद्धेश्वराच्या मंदिरात किसनगिरी, टेंबे स्वामी आणि स्वामी समर्थ यांची एकत्र भेट झाली होती. त्या वेळेस अक्कलकोट स्वामींनी हसत हसत किसनगिरींना सांगितले होते, "ये टेंबे स्वामी मेरे (दत्त के) बारे में लिखते है | वैसा तुम आम जनता के लिये ऐसी बात करो की, जिससे आम जनता का कल्याण हो | "
खरोखरच किसनबाबांनी जनतेसाठी गावोगांव पद यात्रा केल्या व त्यांचे अश्रू पुसले . भगवान नरसिंहाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे दक्षिण काशीच्या परिसरात किसनबाबांनी आपले व्रत चालू ठेवले . स्वामी समर्थांप्रमाणेच किसनबाबांची साईबाबा , गोंदवलेकर व गुलाबराव महाराज, शांताश्रम स्वामी , केवल्याश्रम स्वामी, गुर्लहोसूर, श्री राज राजेश्वर स्वामी, शृंगेरी शंकराचार्य, श्री गोविंदस्वामी, सोलापूरचे मौनी स्वामी, कृष्ण सरस्वती इ. महान व्यक्तींशी मुलाखत झाली होती. अशा या महान व्यक्तीने १९५१ साली समाधी घेतली. त्यांची समाधी कसबा सरूड येथे आहे.
मानवतेचा व सहिष्णुतेचा संदेश देणार्या किसनबाबांनी आपले कार्य अखंड चालू ठेवण्यासाठी श्री पार्लेगिरी महाराज यांची दृष्टांताद्वारे नेमणूक केली.
विशाळगड किल्ला: हा किल्ला घाट व कोकण यांच्या सीमेवर असून पूर्वी याचे नाव खिलगिरी असे होते. शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला. नंतर याला खेळणा किल्ला असेही ओळखले जात होते. या किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या. बीदरच्या बहमानी राज्याचा सेनापति मोहम्मद गवान याच्या सैन्यातील करणसिंह भोसले व त्याचा मुलगा भिमसिंह यांनी घोरपडीच्या (monitor lizard) सहाय्याने किल्ला जिंकला म्हणून भिमसिंहाला घोरपडे ही पदवी देण्यात आली. या इतिहास प्रसिद्द घोरपणे घराण्याच्या मुधोळ, सोंडूर सेनापति कापशी व इचलकरंजी येथे शाखा असून पोटशाखेमध्ये हसूर, गलगले, नवनिहाळ, पांगरे, खडकेवाड, दत्तवाड येथे शाखा आहेत. किसनगिरी यांचा या जहांगीर घराण्यात नवव्या पिढीत जन्म झाला. वर्णाने सावळा असलेल्या कृष्णाबाबांना काळे बाबा, सरकार म्हणून ओळखले जात असत. असेतू हिमाचल तीर्थाटन करून गिरी ही पदवी प्राप्त केली आणि आपले अध्यात्मात वेगळे स्थान निर्माण केले. प्रसिद्धी विन्मुख राहून ईशसेवा व समाजसेवा केली. कोल्हापूरचे पंत प्रतिनिधि आबाजीराव हे किसनगिरींचे समवयस्क व निस्सीम भक्त होते. त्यांच्या विनंतीप्रमाणे त्यांनी निसर्गरम्य सरूड गांवात येण्याचे केले व तेथेच निर्वाण केले. दिनांक ६ मार्च १९५१, वार मंगळवार, धनिष्ठा नक्षत्र, चतुर्दशी कृष्ण पक्ष, शिव योगावर निर्वाण केले. त्यांची समाधी कसबा सरूड येथे आहे.
कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशी येथे श्री महालक्ष्मीचे वास्तव्य असल्यामुळे अनेक देवी-देवतांनीही वास्तव्य केले. या करवीर क्षेत्राला पूर्वी ब्रह्मगिरी किंवा कोलगिरी म्हणून ओळखले जायचे. श्रीआलय म्हणजेच शिराळा. सरूड, कोकरूड येथील निनाई देवी व येळवण येथील जुगाई देवी या तिच्या परिवारातील सह्देवता. अशा क्षेत्राला श्री किसनगिरींनी वास्तव्य केलं यात नवल नाही. बद्री-विहारी म्हणजेच जोतीबा व पुर्णागिरी देवी म्हणजे महालक्ष्मी. पुर्णागिरीला सतीची नाभी पडली व कोल्हापूरमध्ये नेत्र पडले. या शक्ती क्षेत्रातच प्रत्यक्ष महाविष्णू लक्ष्मीरूपात स्थिरावले. म्हणून या क्षेत्रास भुक्ती व मुक्ती दोन्ही मिळते.
No comments:
Post a Comment